चिकन गार्लिक फ्राय  / Chiken Garlic Fry Recipes

          आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत चिकन ची अजून एक चविष्ट अशी रेसिपी . चिकन गार्लिक ( लसूण ) रेसिपी एक सोपी रेसिपी आहे हि रेसिपी हॉटेल मध्ये खूप आवडीने खाल्ली जाते .
साहित्य : 

एक किलो चिकन, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, हळदपूड, गरम मसाला पूड ,धने पूड,  फोडणीसाठी तीन पळ्या तेल, धने, मीठ, लिंबू , एवरेस्ट कांदा लसूण मसाला,सजावटी साठी कोथिंबीर , 10-12 लसणीच्या पाकळ्या 




कृती : 

सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला सुरीच्या साहाय्याने कट मारून घ्यावे नंतर आले, लसूण पेस्ट, मिरचीपूड, हळदपूड, गरम मसाला पूड, धने पूड असे सर्व लावून मेरिनेट करून किमान अर्धा तास ठेवावे व मुरू द्यावे. लसणीच्या पाकळ्या कट केलेल्या ठिकाणी आत मांस मध्ये भरावे नंतर एका रुंद पातेल्यात तेल घालून तापवावे. तेल तापले की  त्यात लसूण, कडीपत्ता , एवरेस्ट कांदालसून मसाला आणि मेरिनेट केलेले चिकन टाकून परतून घ्यावे. त्यानंतर पाणी घातलेले ताट ठेवून वाफेवर शिजून घ्यावे. गॅस ची फ्लेम मंदच ठेवावी. पाणी ऍड न करता चिकन शिजवावे. अधूनमधून परतावे व खाली लागू नये याची काळजी घ्यावी. काही वेळाने चिकन ला पाणी सुटेल. चिकन शिजले का चेक करून मग सुटलेले पाणी पूर्णपणे सुकवून घ्यावे. चिकन शिजल्याची खात्री करून नंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. बारीक  चिरलेली हिरवी कोथिंबीर थोडी थोडी घालावी. त्यानंतर ते सर्व्ह करावे. हे चिकन अतिशय स्वादिष्ट लागते. ते नुसते स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता अथवा चपाती, पराठा किंवा फुलक्यांबरोबर हि चालेल.
गार्लिक चिकन ची रेसिपी आवडल्यास तुम्ही कंमेंट च्या मार्फेत सांगू शकता . तुम्ही तुमच्या फॅमिली मध्ये पाठवू शकता आणि आनंद घेऊ शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Konkan special Kaju Chiken Masala recipes