Konkan special Kaju Chiken Masala recipes


कोकण स्पेशल  !!  Kokan Special  !!

काजू चिकन मसाला रेसिपी !! Kaju Chicken Masala Recipe in Marathi !!

June 11,2023

   आपल्या कोकणामध्ये प्रसिद्ध असलेले काजू सर्वानाच आवडतात . काजू पासून नवनवीन चविष्ट असे पदार्थ बनवले जातात . आज आपण त्याच काजू पासून नॉनव्हेज प्रेमींसाठी एक रेसिपि घेऊन आलो आहोत .

ज्यांना झणझणीत अन्न आवडते त्यांच्यासाठी ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. कोकण स्पेशल काजू चिकन मसाला एक पारंपारिक आणि चविष्ट चिकन रेसिपी आहे. ही खाल्ल्यानंतर त्याची चव पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याच्याकडे ओढत घेऊन जाईल. 

तुमका आमची मालवण पाठ्याची काजू चिकन मसाला रेसिपी नक्की आवडतली नक्की करून बघाच म्हणतंय मी....

अनुक्रमणिका
 
साहित्य
वाटण मसाला 1
वाटण मसाला 2
फोडणी
कृती

साहित्य

1/2 किलो चिकन,3-4 टीस्पून मालवणी तिखट मसाला, 1-2 टीस्पून मालवणी गरम मसाला, 2 टेबलस्पून तेल,1/4 टीस्पून हळद,2 टीस्पून मीठ,2 मध्यम कांदे , काजू  1 वाटी ( 1 दिवस अगोदर पाण्यात भिजवलेले  ) , लिंबू 

वाटण मसाला 1

2 इंच आले,कोथिंबीर,8-10 लसूण पाकळ्या ई. साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.

वाटण मसाला 2

4 कांदे,1 वाटी सुके खोबरे. बारीक करून हलकं गुलाबी रंग  होईपर्यंत फ्राय करून घ्यावे. नंतर थोडं पाणी घालून बारीक मिश्रण करून घ्यावे.

चिकन मॅरीनेट ची कृती 

स्वच्छ  चिकन धुऊन त्या चिकन चे बारीक तुकडे करून त्याला हळद , थोडे मीठ , मालवणी मसाला , वाटलेले आलं , लसूण, लिंबू चा रस व कोथिंबीर लावून अर्धा तास ठेवावे.

फोडणी

   मंद गॅस वर एक पातेले गरम करून त्यात प्रथम 2-3 टीस्पून तेल तापवून घ्यावे. मग 2 बारीक चिरलेले कांदे, गरम मसाला, मालवणी मसाला आणि वाटण नंबर 1 मिश्रण घालून मंद गॅसवर परतवावेत .भिजवलेले काजू आणि मॅरीनेट चिकनचे तुकडे घालून सर्व परतवावे व मंद गॅसवर वाफेवर 10 मिनटं शिजत ठेवावे. काजू पूर्णपणे शिजले पाहिजे (पाणी न  घालता वाफेवर शिजवले  तर चिकन ची चव खूप छान येते ) चिकन शिजवुन झाले की मग त्यात वाटण नंबर 2 घालून त्यात थोडे पाणी  ऍड करून उकळी येईपर्यंत 10 मिनिटं शिजवुन घ्यावे. आणि वरून  छान कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. सोबत कांदा, टोमॅटो आणि लिंबू च्या  गोल शेप मध्ये कट करून सर्व्ह करावा. हा काजू चिकन मसाला तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाता सोबत सर्व्ह करू शकता.                 
    !! तुम्हाला हि रेसिपि आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र परिवार मध्ये पाठवू शकता आणि रेसिपी घरी बनवून त्याचा आनंद घेऊ शकता. !!





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट