पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
चिकन गार्लिक फ्राय  / Chiken Garlic Fry Recipes           आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत चिकन ची अजून एक चविष्ट अशी रेसिपी . चिकन गार्लिक ( लसूण ) रेसिपी एक सोपी रेसिपी आहे हि रेसिपी हॉटेल मध्ये खूप आवडीने खाल्ली जाते . साहित्य :  एक किलो चिकन, आले लसूण पेस्ट, लाल तिखट, हळदपूड, गरम मसाला पूड ,धने पूड,  फोडणीसाठी तीन पळ्या तेल, धने, मीठ, लिंबू , एवरेस्ट कांदा लसूण मसाला,सजावटी साठी कोथिंबीर , 10-12 लसणीच्या पाकळ्या  कृती :  सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. त्याला सुरीच्या साहाय्याने कट मारून घ्यावे नंतर आले, लसूण पेस्ट, मिरचीपूड, हळदपूड, गरम मसाला पूड, धने पूड असे सर्व लावून मेरिनेट करून किमान अर्धा तास ठेवावे व मुरू द्यावे. लसणीच्या पाकळ्या कट केलेल्या ठिकाणी आत मांस मध्ये भरावे नंतर एका रुंद पातेल्यात तेल घालून तापवावे. तेल तापले की  त्यात लसूण, कडीपत्ता , एवरेस्ट कांदालसून मसाला आणि मेरिनेट केलेले चिकन टाकून परतून घ्यावे. त्यानंतर पाणी घातलेले ताट ठेवून वाफेवर शिजून घ्यावे. गॅस ची फ्लेम मंदच ठेवावी. पाणी ऍड न करता चिकन शिजवावे. अधूनमधून परतावे व खाली लागू नये याची काळजी घ्याव

Konkan special Kaju Chiken Masala recipes

इमेज
कोकण  स्पेशल    !!  Kokan Special  !! काजू चिकन मसाला रेसिपी !!   Kaju Chicken Masala Recipe in  Marathi !! June 11,2023    आपल्या कोकणामध्ये प्रसिद्ध असलेले काजू सर्वानाच आवडतात . काजू पासून नवनवीन चविष्ट असे पदार्थ बनवले जातात . आज आपण त्याच काजू पासून नॉनव्हेज प्रेमींसाठी एक रेसिपि घेऊन आलो आहोत . ज्यांना झणझणीत अन्न आवडते त्यांच्यासाठी ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. कोकण  स्पेशल  काजू चिकन मसाला एक पारंपारिक आणि चविष्ट चिकन रेसिपी आहे. ही खाल्ल्यानंतर त्याची चव पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याच्याकडे ओढत घेऊन जाईल.  तुमका आमची मालवण पाठ्याची काजू चिकन मसाला रेसिपी नक्की आवडतली नक्की करून बघाच म्हणतंय मी.... अनुक्रमणिका   साहित्य वाटण मसाला 1 वाटण मसाला 2 फोडणी कृती साहित्य 1/2 किलो चिकन,3-4 टीस्पून मालवणी तिखट मसाला, 1-2 टीस्पून मालवणी गरम मसाला, 2 टेबलस्पून तेल,1/4 टीस्पून हळद,2 टीस्पून मीठ,2 मध्यम कांदे , काजू  1 वाटी ( 1 दिवस अगोदर पाण्यात भिजवलेले  ) , लिंबू  वाटण मसाला 1 2 इंच आले,कोथिंबीर,8-10 लसूण पाकळ्या ई. साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. वाटण मसाला 2 4 कांदे,1 वाटी सुके खोबर
इमेज
        सोलकढी                           मासे, चिकन किंवा मटणाचा बेत असेल तर हमखास सोल कढी करण्यात येते. सोलकढी म्हणजे, ताकासाठी असलेला पर्याय असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. यासाठी कोकम आणि नारळाचं (खोबऱ्याचं) दूध या पदार्थांची गरज असते. खरं तर सोलकढी तुम्ही नुसतीच पिऊ शकता .  उन्हाळ्यातही सोलकढी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आणि नारळाच्या दूधामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी उत्तम ठरते. सोलकढी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि तयार करण्याची कृती... साहित्य : ताज्या नारळाचं दूध  कोकम हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरून लसूण पाकळ्या मीठ चवीनुसार  कृती : एक कप ताज्या खोबऱ्याचे तुकडे आणि एक कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडरमध्य घालून त्याची प्युरी तयार करा. सुती कपड्याने तयार प्युरी गाळून घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दूध तयार करा. त्यातून उरलेला चोथा टाकून द्या.  तुम्ही रेडिमेड कोकनट मिल्कचाही वापर करू शकता.  पाण्यामध्ये कोकम भिजत ठेवा. त्यामुळे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दू
इमेज
  मालवणी चिकन मसाला रेसिपी | Malvani Chicken Masala Recipe in Marathi June 4,2023 मालवणी चिकन मसाला रेसिपी | Malvani Chicken Masala Recipe in Marathi ज्यांना झणझणीत अन्न आवडते त्यांच्यासाठी ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. मालवणी चिकन मसाला एक पारंपारिक आणि चविष्ट चिकन रेसिपी आहे. ही खाल्ल्यानंतर त्याची चव पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याच्याकडे ओढत घेऊन जाईल.  तुमका आमची मालवण पाठ्याची चिकन मसाला रेसिपी नक्की आवडतली नक्की करून बघाच म्हणतंय मी.... अनुक्रमणिका   साहित्य वाटण मसाला 1 वाटण मसाला 2 फोडणी कृती साहित्य 1/2 किलो चिकन,3-4 टीस्पून मालवणी तिखट मसाला, 1-2 टीस्पून मालवणी गरम मसाला, 2 टेबलस्पून तेल,1/4 टीस्पून हळद,2 टीस्पून मीठ,2 मध्यम कांदे,  लिंबू वाटण मसाला 1 2 इंच आले,कोथिंबीर,8-10 लसूण पाकळ्या ई. साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. वाटण मसाला 2 4 कांदे,1 वाटी सुके खोबरे. बारीक करून हलकं गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यावे. नंतर थोडं पाणी घालून बारीक मिश्रण करून घ्यावे. चिकन मॅरीनेट ची कृती   स्वच्छ चिकन धुऊन त्या चिकन चे बारीक तुकडे करून त्याला हळद,थोडे मीठ, मालवणी मसाला, वाटलेले