मालवणी चिकन मसाला रेसिपी
| Malvani Chicken Masala Recipe in Marathi

June 4,2023

मालवणी चिकन मसाला रेसिपी | Malvani Chicken Masala Recipe in Marathi

ज्यांना झणझणीत अन्न आवडते त्यांच्यासाठी ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. मालवणी चिकन मसाला एक पारंपारिक आणि चविष्ट चिकन रेसिपी आहे. ही खाल्ल्यानंतर त्याची चव पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याच्याकडे ओढत घेऊन जाईल. 

तुमका आमची मालवण पाठ्याची चिकन मसाला रेसिपी नक्की आवडतली नक्की करून बघाच म्हणतंय मी....

अनुक्रमणिका
 
साहित्य
वाटण मसाला 1
वाटण मसाला 2
फोडणी
कृती

साहित्य

1/2 किलो चिकन,3-4 टीस्पून मालवणी तिखट मसाला, 1-2 टीस्पून मालवणी गरम मसाला, 2 टेबलस्पून तेल,1/4 टीस्पून हळद,2 टीस्पून मीठ,2 मध्यम कांदे, लिंबू

वाटण मसाला 1

2 इंच आले,कोथिंबीर,8-10 लसूण पाकळ्या ई. साहित्य एकत्र करून बारीक वाटून घ्यावे.

वाटण मसाला 2

4 कांदे,1 वाटी सुके खोबरे. बारीक करून हलकं गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यावे. नंतर थोडं पाणी घालून बारीक मिश्रण करून घ्यावे.

चिकन मॅरीनेट ची कृती 

स्वच्छ चिकन धुऊन त्या चिकन चे बारीक तुकडे करून त्याला हळद,थोडे मीठ, मालवणी मसाला, वाटलेले आलं,लसूण, लिंबू व कोथिंबीर लावून अर्धा तास ठेवावे.

फोडणी

मंद गॅस वर एक पातेले गरम करून त्यात प्रथम 2-3 टीस्पून तेल तापवून घ्यावे. मग 2 बारीक चिरलेले कांदे, गरम मसाला, मालवणी मसाला आणि वाटण नंबर 1  मिश्रण घालून मंद गॅसवर परतावेत.नंतर मॅरीनेट चिकनचे तुकडे घालून सर्व परतावे व मंद गॅसवर वाफेवर 10 मिनटं शिजत ठेवावे.(पाणी न  घालता वाफेवर शिजवले  तर चिकन ची चव थोडी  वेगळीच येते) चिकन शिजवुन झाले की मग त्यात  वाटण नंबर 2 घालून त्यात थोडे पाणी  ऍड करून उकळी येईपर्यंत 10 मिनिटं शिजवुन घ्यावे. आणि वरून  छान  कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. तसेच सजावटी साठी  कांदा, टोमॅटो आणि लिंबू गोल शेप मध्ये कट करून सर्व्ह करावा. हा मालवणी चिकन मसाला तुम्ही भाकरी, चपाती किंवा भाता सोबत सर्व्ह करू शकता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट